 
						Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवुन देण्यासाठी ओळखले जातात. सध्या या रेल कंपनीचे शेअर्स सर्वकालीन उच्चांकाजवळ ट्रेड करत आहेत. 20 जून 2022 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 93.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Titagarh Rail Systems Share Price Today)
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 498.40 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 474.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
19 जून 2020 रोजी टिटागड रेल सिस्टम्स स्टॉक 36.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक 474 रुपयेवर पोहचला आहे. मागील तीन वर्षांत टिटागढ रेल सिस्टीम्स स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1245 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरने लोकांना 398.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 42.74 टक्के वाढले आहेत.
अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टिटागड रेल सिस्टम्स स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने टिटागढ रेल सिस्टीम्स स्टॉकवर 694 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीच्या तुलनेत 55 टक्के अधिक आहे. टीटागढ़ रेल सिस्टीम्स ही कंपनी रेल वॅगन बनवणारी आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी भारतातील प्रवासी रेल्वे प्रणालीच्या दिग्गज उत्पादकांपैकी एक मानली जाते.
पुढील पाच वर्षात या कंपनीची व्यापारी उलाढाल 9,000-10,000 कोटीपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीने पुढील तीन वर्षात 600 कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. कंपनी मोठ्या गुंतवणूकदाराला शेअर्स विकून 289 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
मार्च 2023 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीच्या नऊ प्रवर्तकांनी कंपनीचे 47.83 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आणि 107,836 सार्वजनिक लोकांकडे कंपनीचे 52.17 टक्के भाग भांडवल म्हणजेच 6.23 कोटी शेअर्स होते. 1.04 लाख सार्वजनिक शेअर धारकांनी 2.77 कोटी शेअर्स म्हणजेच 23.17 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
टीटागड रेल सिस्टीम्स लिमिटेड आणि सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या दोन्ही कंपन्या मिळून 80 वंदें भारत स्लीपर गाड्या बनवणार आहेत. या दोन्ही कंपन्यांना एकत्रित 24,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. भारतीय रेल्वेने पुढील 35 वर्षांसाठी संपूर्ण ट्रेन सेटचे डिझाईन, उत्पादन आणि देखभाल करण्याचा एवढा मोठा करार भारतीय कंपन्यांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		