
Titan Company Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील अनेक कंपन्याचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीचे शेअर्स देखील त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहेत. या शेअरमधील कमालीच्या वाढीमुळे ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या संपत्तीत एका महिन्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 5.17 टक्के म्हणजेच 4,58,95,970 शेअर्स होल्ड केले आहेत. (Titan Company Limited)
शेअरची कामगिरी :
‘टायटन’ कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 2397.10 रुपये प्रति शेअरवरून वाढून 2578 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. एका महिन्यात शेअरची किंमत 150.90 रुपयेने वाढली आहे. डिसेंबर 2022 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेअर्स होते. टायटन कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती एका महिन्यात जवळपास 6,92,57,01,873 रुपये म्हणजेच 692 कोटीं रुपये वाढली आहे. सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 2,578.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
डिसेंबर 2022 च्या तिमाही आकडेवारीनुसार भारतीय विमा क्षेत्रातील दिग्गज ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीने टायटन कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. LIC ने टायटन कंपनीचे 2,05,19,699 शेअर्स म्हणजेच 2.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. त्याच वेळी एलआयसीकडे सप्टेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीचे 2,89,63,596 शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 3.26 टक्के होते. याचा अर्थ एलआयसी कंपनीने तिसऱ्या तिमाहीत टायटन कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. SBI निफ्टी-50 ETF ने देखील टायटन कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीपर्यंत SBI निफ्टी-50 ETF ने टायटन कंपनीचे 1,40,05,693 शेअर्स म्हणजेच जवळपास 1.58 टक्के भाग भांडवल धारण केले होते. जानेवारी ते मार्च 2023 मधील लेटेस्ट आकडे अद्याप जाहीर झालेले नाहीत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.