
Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट फॅशन कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 2,840 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे बाजार भांडवल देखील 1 लाख कोटी रुपयांच्या पार गेले आहेत.
टाटा समूहाचा भाग असलेली ट्रेंट ही 5 वी कंपनी आहे जिचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 2484.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के वाढीसह 2,822.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
27 जानेवारी 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 1155.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक पातळीवरून 150 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 2023 या वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात ट्रेंट कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
टाटा समूहाचा भाग असलेल्या TCS कंपनीचे बाजार भांडवल सर्वात जास्त आहे. TCS कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12.84 लाख कोटी रुपये आहे. तर बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा समूहात TCS नंतर टायटन कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 3.10 लाख कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.35 लाख कोटी रुपये आहे. तर टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.6 लाख कोटी रुपये आहे.
सप्टेंबर 2023 तिमाहीत ट्रेंट कंपनीचा निव्वळ नफा 56 टक्के वाढीसह 289.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत ट्रेंट कंपनीने 59 टक्के वाढीसह 2,891 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच तिमाहीत कंपनीचा एबिटा 73 टक्क्यांच्या वाढीसह 461 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. सप्टेंबर तिमाहीत ट्रेंट कंपनीचा EBITDA मार्जिन 15.9 टक्केवर पोहचला आहे. HDFC सिक्युरिटीज फर्मने ट्रेंट कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 1,650 रुपये पर्यंत कमी करून स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.