
Trent Share Price| मार्च 2023 तिमाहीत टाटा उद्योग समूहाच्या मालकीची कंपनी ‘ट्रेंट’ ने कमालीची कामगिरी केली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ज्ञ ट्रेंट कंपनीच्या शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. ट्रेंट कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही निकालांनुसार जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत कंपनीने 45.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 20.87 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, ब्रोकरेज फर्म सेंट्रम ब्रोकिंग टाटा समूहाच्या मालकीच्या ट्रेंट कंपनीच्या शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसच्या अहवालानुसार ट्रेंट कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1721 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत ट्रेंट कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेंट कंपनीचे शेअर्स 0.96 टक्क्यांच्या घसरणीसह 1366.85 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ट्रेंट कंपनीने वार्षिक आधारावर 64.26 टक्के अधिक महसूल संकलित केला आहे. या कालावधीत कंपनीने 2182.75 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील एका वर्षात ट्रेंट कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांना 10.66 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. ट्रेंट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1566 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 982.85 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.