 
						Trident Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत जे गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देतात, त्यात ट्रायडंट कंपनीचे नाव देखील येते. ट्रायडंट कंपनीने मागील वीस वर्षांत आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांची संपत्ती अनेक पटींनी वाढवली आहे. 6 जून 2001 रोजी ट्रायडंट कंपनीचा एक शेअर फक्त पन्नास पैसे किमतीवर ट्रेड करत होता. 5 एप्रिल 2002 रोजी या स्टॉकची किंमत 35 पैशांवर आली होती. मात्र त्यात जबरदस्त वाढ झाली असून शेअरची किंमत सध्या 36 रुपयांवर आली आहे.
5 एप्रिल 2002 रोजी जर तुम्ही या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.04 कोटी रुपये झाले असते. ट्रायडेंट कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 14 ऑक्टोबर रोजी BSE निर्देशांकावर 36.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअर्स हळूहळू वाढ दाखवत आहे. या कंपनीतील गुंतवणूकदाराची छोटीशी गुंतवणूकही भविष्यात त्यांना करोडपती बनवू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
विक्रमी उच्चांक किंमत :
18 जानेवारी 2022 रोजी ट्रायडंट कंपनीचा शेअर 70.90 रुपयांवर ट्रेड करत होता. 2002 मध्ये ज्याने एक लाख रुपये गुंतवले होते त्याने जर 70.90 रुपयांवर आपली गुंतवणूक विकली असती तर त्याला एकूण 2.03 कोटी रुपये परतावा मिळाला असता. अशा रीतीने या स्टॉक मध्ये अल्प गुंतवणुक करणारे लोक आता करोडपती बनवले असते. जानेवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, जागतिक अस्थिर परिस्थितीचा ट्रायडंटच्या व्यवसायाला जबर फटका बसला आहे. त्यानंतर हा स्टॉक सातत्याने घसरत आहे. सध्या हा आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या 49 टक्क्यांपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
ट्रायडंट कंपनीबद्दल थोडक्यात :
ट्रायडंट ही बेडशीट आणि टॉवेलचे उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी कागद, धागा आणि रसायने निर्मितीचे कामही करते. ट्रायडंटच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हा एक 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा मोठा जागतिक उद्योग समूह आहे, ज्यात कंपनी मुख्यतः घरगुती कापड, कागद आणि रसायनांचा व्यापार करते.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
BSE निर्देशांकावर वर उपलब्ध चार्ट पॅटर्न डेटानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ट्रायडंट कंपनीचे प्रदर्शन चांगले नव्हते. एप्रिल-जून 2022 या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 173.55 कोटींवरून 123.80 कोटीं रुपयेवर आला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या महसूलात जबरदस्त घट होऊन 1,847.14 कोटी रुपयांवरून 1667.07 कोटी रुपये झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		