
Trident Techlabs IPO | ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 21 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 33 रुपये ते 35 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.
सध्या ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 115 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 16.03 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 75 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
ग्रे मार्केटमध्ये ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक 35 रुपये या आपले प्राइस बँडवर वाटप करण्यात आला तर, ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीचे शेअर्स 75 रुपयेच्या आसपास सूचीबद्ध होऊ शकतात. ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये शेअर्स अलॉट होतील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी तब्बल 115 टक्के नफा मिळू शकतो.
किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉट खरेदी करू शकतात. एका लॉटमध्ये कंपनीने 4000 शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 140000 रुपये जमा करावे लागतील.
ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स बुधवार 27 डिसेंबर रोजी वाटप केले जातील. आणि शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक शेअरबाजारात सूचीबद्ध केला जाईल. या कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध केला जाणार आहे.
ट्रायडेंट टेकलॅब्स ही कंपनी मुख्यतः एरोस्पेस, संरक्षण, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, सेमीकंडक्टर आणि उर्जा वितरण उद्योगांना तंत्रज्ञान सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. आयपीओपूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 92.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.