
Trident Vs Welspun Share | वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. आणि आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत पडझड झाली आहे. जुलै ते सप्टेंबर 2023 या काळात कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली राहिली आहे.
मात्र तरीही शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करताना पाहून गुंतवणुकदार देखील हैराण झाले आहे. तिमाही निकालानुसार वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 2300 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी वेलस्पन इंडिया लिमिटेड स्टॉक 8.26 टक्के घसरणीसह 130.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या तिमाहीत कंपनीने तब्बल 200 कोटी पेक्षा जास्त निव्वळ नफा कमावला आहे. वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीच्या तिमाही निकालांनुसार, जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कंपनीने 200.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीने 8.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी जून 2023 मधील तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात 23.15 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीने या तिमाहीत 2509.08 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2113.46 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर 11.48 टक्क्यांच्या वाढीसह 142.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी वेलस्पन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 78 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.