
TTK Healthcare Share Price | ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअरमध्ये काल कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 1,450 रुपयांवर पोहोचले होते. दिवसा अखेर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि शेअर 3.51 टक्के वाढीसह 1,303.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सने आपली 5 वर्षांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी ऐच्छिक डिलिस्टिंग योजना जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली. (TTK Healthcare Limited)
‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीच्या शेअर्सने यापूर्वी 16 फेब्रुवारी 2018 रोजी 1457.65 रुपये ही आपली विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1450 रुपये होती. मागील 14 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने 70 टक्के उसळी घेतली आहे. 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 847.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टीटीके हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स गुरुवार 6 एप्रिल 2023 रोजी 1450 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 667.50 रुपये होती.
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘टीटीके हेल्थकेअर’ कंपनीने 182.56 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीने एकूण 12 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीची 20 एप्रिल 2023 रोजी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीच्या ऐच्छिक डिलिस्टिंगच्या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. डिसेंबर 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी 74.56 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. त्याच वेळी वैयक्तिक शेअर धारकांनी कंपनीचे 15.49 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2.32 टक्के, म्युच्युअल फंड 2.17 टक्के आणि कॉर्पोरेट संस्था 3.17 टक्के भाग भांडवल होल्ड करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.