
TTML Share Price | मंगळवारी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: TTML) मिळाली होती. मंगळवारी टीटीएमएल शेअर इंट्राडे मध्ये १३ टक्क्यांनी वाढून ७८.११ रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी टीटीएमएल शेअर 11.15 टक्के वाढून 76.75 रुपयांवर पोहोचला होता. (टीटीएमएल कंपनी अंश)
टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 111.40 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 65.05 रुपये होती. टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 15,008 कोटी रुपये आहे.
शेअर्समध्ये तेजी येण्याची कारणे
टीटीएमएल कंपनी शेअर्सच्या तेजी मागील मुख्य कारण आहे केंद्र सरकारची एक घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाने टेलिकॉम कंपनीच्या बँक गॅरंटी संबंधित महत्वाचा निर्णय घेतल्याने टीटीएमएल शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२ पर्यंत स्पेक्ट्रम खरेदीसाठी थकीत बँक गॅरंटी माफ करून टेलिकॉम कंपन्यांना मोठ्या आर्थिक दिलासा दिला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम खरेदीसाठी टेलिकॉम ऑपरेटर्सची बँक गॅरंटी माफ करण्यास अनुकूलता दर्शविली होती. तसेच, टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरच्या किमतीत वाढ होण्यास कारणीभूत ठरणारा एक प्राथमिक घटक म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील एकंदरीत सकारात्मक भावना. विदेशात डिजिटल सेवांची मागणी वाढत असताना टेलिकॉम कंपन्यांच्या भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल गुंतवणूकदार अधिकाधिक आशावादी होत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
शेअरने 2,692% परतावा दिला
मागील १ महिन्यात टीटीएमएल शेअरने 8.20% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात शेअरने 0.92% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 12.93% घसरला आहे. मागील ५ वर्षात टीटीएमएल शेअरने 2,692.73% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना टीटीएमएल शेअरने 946.32% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर शेअर 15.97% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.