
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290.15 रुपयांवरून 66.90 रुपयांपर्यंत घसरले आहेत. मागील वर्षी जानेवारी 2021 पर्यंत या शेअर मध्ये कमाईची तेजी पाहायला मिळत होती. परंतु मागील एका वर्षभरापासून स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. मागील वर्षी 2022 च्या सुरुवातीला ज्या लोकांनी टीटीएमएल स्टॉक खरेदी केला होता, त्यांना आता जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता कमी होऊन 45000 झाले आहे. या कालावधीत टीटीएमएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे 54.49 टक्के नुकसान केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
11 जानेवारी 2021 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 290.15 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर, स्टॉक मध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.15 टक्के वाढीसह 67.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023 या नवीन वर्षात टीटीएमएल स्टॉकमध्ये 27.12 टक्के घसरण झाली आहे. मागील सहा महिन्यात या शेअरची किंमत 36 टक्क्यांहून अधिक कमजोर झाली आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 21 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 64.70 रुपये होती.
टीटीएमएल कंपनीबद्दल थोडक्यात :
टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली टीटीएमएल कंपनी Tata Teleservices ची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. टीटीएमएल कंपनी या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर मानली जाते. टीटीएमएल कंपनी व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत दिग्गज कंपन्यांचे नाव सामील आहे. मागील एका महिन्यात या कंपनीने आपल्या ग्राहक कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा लाँच केली आहे. ही कंपनी आपल्या ग्राहक कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइइड नियंत्रण प्रदान करते, त्यामुळे कंपनीच्या सेवेल प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. क्लाउड आधारित सुरक्षा सेवा ही कंपनीची खास वैशिष्ट्य असून या माध्यमातून कंपनी आपल्या ग्राहकांना डेटा सुरक्षित ठेवण्याची हमी देते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.