
TTML Share Price | ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल या टाटा उद्योग समूहाच्या टेलिकॉम कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त पुनरागमन केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 67.43 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 वाढीसह 61.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने 20 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. त्याच वेळी या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
31 मार्च 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 61 रुपये किमतीवर पोहचला आहे. 31 मार्च रोजी ‘Tata Teleservices Maharashtra Limited’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 55.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल 10 एप्रिल 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 67.43 रुपयांवर पोहोचले होते. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 20 टक्के पेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. त्याच वेळी 28 मार्च 2023 पासून, टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स जवळपास 30 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12395 कोटी रुपये आहे.
3 वर्षात दिला 3000 टक्के परतावा :
‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 3015 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 एप्रिल 2020 रोजी टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 2.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 एप्रिल 2023 रोजी टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 67.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 33.21 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.