 
						Upcoming IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या यशस्वी आयपीओनंतर आता टाटा समूह आणखी एका कंपनीचा IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा समूह लवकरच टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच करण्याची शक्यता आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीने Nexon EV आणि Tiago EV यासारख्या प्रसिद्ध कार मॉडेल्सची निर्मिती केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 939.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा IPO पुढील 12 ते 18 महिन्यांत लाँच होण्याची शक्यता आहे. ही कंपनी आपल्या पब्लिक इश्यूद्वारे 1 ते 2 अब्ज डॉलर्स भांडवल उभारणी करू शकते. टाटा समूह पुढील काही वर्षांत ईव्ही क्षेत्रात अतिशय आक्रमकपणे व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासह टाटा मोटर्स कंपनीने EV क्षेत्रात 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये IPO लाँच करण्याची मजबूत शक्यता आहे. सध्याची परिस्थिती इलेक्ट्रिक वाहन कंपनीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. टाटा मोटर्स कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीमध्ये अधिक 1 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे.
जानेवारी 2023 मध्ये टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीने TPG कडून 1 अब्ज डॉलर भांडवल उभारणी केली होती. त्यानंतर टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी चर्चेत आली होती. सध्याच्या परिस्थितीत या कंपनीचा IPO आला टाटा समूहाला जबरदस्त फायदा होऊ शकतो. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 940.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		