 
						Urban Enviro Waste Share Price | अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे आयपीओ शेअर्स गुरुवार दिनांक 22 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE Emerge इंडेक्सवर लिस्ट करण्यात आले होते.
IPO शेअर्सची लिस्टिंग 41 टक्के प्रीमियम किमतीवर
या कंपनीच्या IPO शेअर्सची लिस्टिंग 41 टक्के प्रीमियम किमतीवर झाली होती. अर्बन एनव्हायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. तर या IPO शेअरची इश्यू किंमत 100 रुपये प्रति शेअर होती. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटसह 140.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
IPO तपशील
अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचा IPO स्टॉक 255.49 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर 11.42 लाख शेअर्सच्या ऑफरवर 27.72 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा IPO 12 जून 2023 ते 14 जून 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला होता.
या कालावधीत किरकोळ श्रेणीमध्ये 220.65 पट आणि इतर श्रेणीमध्ये 281.41 पट बोली प्राप्त झाली होती. या कंपनीच्या IPO मध्ये विकास शर्मा यांनी 2.22 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत आणि 9.2 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकण्यात आले आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात
अर्बन एन्व्हायरी वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी देशभरात कचरा व्यवस्थापन उपाय आणि म्युनिसिपल सॉलिड वेस्ट व्यवस्थापन संबधित सेवा देण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना कचरा संकलन, वाहतूक, पृथक्करण आणि विल्हेवाट सेवा यासारख्या सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		