
Urja Global Share Price | उर्जा ग्लोबल लिमिटेड या बॅटरी निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी 20 टक्के अप्पर सर्किट हीट केला आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत 10.60 रुपयेवर पोहचली होती. उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक झालेली ही वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीने एक व्यापारी करार केला आहे.
7 जून रोजी 2023 उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीने टेस्ला पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19.77 टक्के वाढीसह 10.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सेबीला सादर केलेल्या माहितीनुसार, उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनी आणि टेस्ला पॉवर कंपनी यूएसए ब्रँड अंतर्गत बॅटरीचे उत्पादन आणि पुरवठा करणार आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या 25,57,861 शेअरची खरेदी ऑर्डर पेंडींग होती. तर सेलिंग साईड पूर्ण रिकामी होती.
शेअरची कामगिरी
1 वर्षापूर्वी उर्जा ग्लोबल कंपनीचे शेअर्स 13.25 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 10.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांनी अल्पावधीत चांगली कमाई केली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 35.90 टक्के मजबूत झाले आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.