
UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कोविड 19 नंतरच्या रॅलीमध्ये UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 2200 टक्के वाढले आहे. अवघ्या 40 महिन्यांत UY फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,200 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 525 कोटी रुपये आहे. एप्रिल 2020 मध्ये UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 1.3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 27.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुंतवणुकीवर परतावा :
UY फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 160 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला UY फिनकॉर्प कंपनीने एएनएस डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड मधील संपूर्ण भाग भांडवल विकून निर्गुंतवणूक केल्याची घोषणा केली होती. UY फिनकॉर्प कंपनीकडे ADPL कंपनीचे 32,00,000 इक्विटी शेअर्स होते, ज्याचे एकूण भाग भांडवलाच्या 14.13 टक्के होते. हे शेअर्स गोल्डन गोएंका क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला शेअर खरेदी करार अंतर्गत विकण्यात आले आहेत.
निर्गुंतवणुक तपशील :
UY फिनकॉर्प कंपनीने चार्टर्ड अकाउंटंट आणि SEBI द्वारे मंजूर मर्चंट बँकरने जारी केलेल्या मूल्यांकन प्रमाणपत्राच्या आधारे ADPL कंपनीमधील आपले सर्व शेअर्स गोएंका क्रेडिट कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे मूल्यांकन 31 मार्च 2023 रोजी ADPL कंपनीच्या आर्थिक विवरणाचे विश्लेषण करून जाहीर करण्यात आले होते.
नवीनतम मूल्यांकनानुसार ADPL कंपनीच्या शेअरची किंमत 253.88 रुपये आहे. आणि UY फिनकॉर्प कंपनीने ADPL कंपनीमध्ये 81.24 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स होल्ड केले आहेत. UY फिनकॉर्प कंपनीच्या गुंतवणूकीचे मूल्य मागील दोन वर्षांत 10 पट अधिक वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.