15 December 2024 5:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Olectra Greentech Share Price | 4 रुपयाच्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्सनी आयुष्य बदललं, आजही तेजी कायम, गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई होतेय

Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदार नेहमी चांगल्या कमाईच्या अपेक्षेने गुंतवणूक करत असतो. मात्र सर्व शेअर्स भरघोस कमाई करून देतील असे होत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करणे इतकं पण सोपं नाहीये. त्यासाठी स्टॉक बाबत सखोल संशोधन करावं लागतं. मात्र असे काही शेअर्स असतात, जे एवढा तेजीत आले तर गुंतवणुकदारांना श्रीमंत करूनच सोडतात. असाच एक स्टॉक म्हणजे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड.

एकेकाळी 4 रुपयेवर ट्रेड करणारे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स आता 1100 रुपयेच्या पार गेले आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 0.83 टक्के वाढीसह 1,087.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली आहे. मात्र गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून बक्कळ कमाई केली आहे. 25 जून 2004 रोजी, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1100 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2004 नंतर या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत आले.

2008 मध्ये शेअरची किंमत 50 रुपयेच्या पार गेली. 2008 ते 2016 पर्यंत हा स्टॉक 10 रुपये ते 25 रुपये दरम्यान ट्रेड करत होता. 2017 मध्ये या कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 200 रुपयेच्या पार गेले होते. नंतर कोरोना महामारीमध्ये तर हा स्टॉक 55 रुपये पर्यंत खाली आला होता.

2023 हा वर्ष ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीसाठी सकारात्मक राहिला आहे. प्रथमच या कंपनीच्या शेअरने 1000 रुपये किंमत पार केली आणि स्टॉक 1138 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1465 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 374.10 रुपये होती. एखाद्या तुम्ही 2004 मध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर खरेदी केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य करोडो रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x