
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के घसरणीसह 510.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.99 लाख कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात (NSE: Vedanta) या कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 146 टक्के वाढली आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर पोहचले होते. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
या स्टॉकचा आरएसआय 74.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 492 टक्के परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.49 घसरणीसह 509.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील 5 वर्षांत दिला 255% परतावा
वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचा एक वर्षाचा बीटा 1.2 आहे, जो या कालावधीत उच्च अस्थिरता दर्शवतो. 2024 या वर्षात वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 99 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 255 टक्के वाढली आहे. वेदांता स्टॉक आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.
स्टॉक टेक्निकल चार्ट
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मंदीचे संकेत मिळत आहेत. या स्टॉकला टेक्निकल चार्टवर 524 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना हा स्टॉक 506 रुपये सपोर्ट लेव्हलच्या खाली खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स दीर्घकाळात 550 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 430 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांचे मत आणि कंपनीबाबत माहिती
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूकदारांना वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 515-525 रुपये झोनमध्ये नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या स्टॉकला 525 रुपये किमतीवर प्रतिरोध मिळत आहे. वेदांता लिमिटेड ही कंपनी वेदांत रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी असून भारत, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामध्ये तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह अयस्क, पोलाद आणि ॲल्युमिनियम आणि उर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.