21 January 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

२९०० कोटीचं कर्जप्रकरण, अनिल अंबानी समूहाचं मुख्यालय YES बँक ताब्यात घेणार

Yes Bank, Takes Over Anil Ambani Group, headquarter In Mumbai, Failure To Repay loans

मुंबई, ३० जुलै : रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या संकटात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील एका मोठ्या बँकेनं त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी क्षेत्रातील बँक ‘येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या अन्य दोन कार्यालयांसाठीदेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर सर्व बँकांचं १२ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. दरम्यान, या कारवाईबाबत यस बँकेने सांगितले की, रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरला बँकेने २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज गिले होते. आता त्या कर्जाच्या वसुलीसाठी ही प्रक्रिया क्रमवारपद्धतीने अवलंबणात आली आहे. दरम्यान, बँकेने नागिन महाल येथील रिलायन्सच्या कार्यालयाचे दोन मजले आपल्या ताब्यात घेतले आहेत. थकबाकीदाराची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करून आपल्या कर्जाची भरपाई करण्याचा बँकेला अधिकार आहे, असे ही बँकेने स्पष्ट केले.

 

News English Summary: Yes Bank issued a notice in Wednesday’s newspaper stating that it was taking possession of two office premises of Anil Dhirubhai Ambani Group (ADAG), including its headquarters ‘Reliance Centre’ in Santacruz, Mumbai.

News English Title: Yes Bank Takes Over Anil Ambani Group headquarter In Mumbai For Failure To Repay Rupees 2892 Crore News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AnilAmbani(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x