
Vedanta Share Price | मागील काही दिवसापासून वेदांता स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र हा स्टॉक नफा वसुलीला बळी पडला आहे. आज सकाळी सुरवातीच्या काही तासात वेदांता स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढत गेला आणि शेअर लाल निशाणीवर आला. ( वेदांता कंपनी अंश )
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 2.80 टक्क्यांच्या वाढीसह 444.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी वेदांता स्टॉक 1.49 टक्के घसरणीसह 430.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुवामा फर्मचा अंदाज आहे की 31 मे पासून MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सच्या पुनर्संतुलनामुळे वेदांता कंपनीमध्ये 54 दशलक्ष डॉलर्स गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. FII आणि पॅसीव फंड वेदांता कंपनीचे 10.4 दशलक्ष शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक करण्याची शक्यता आहे. याशिवाय MSCI ने एयू स्मॉल फाइनेंस बँक, मॅक्रोटेक डेवलपर्स, झोमॅटो, पॉलीकॅब, संवर्धन मदरसन, येस बँक आणि सुजलॉन एनर्जी या कंपन्याचे देखील वेटेज वाढवले आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी सध्या वेदांता कंपनीचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट करू शकतो. तज्ञांच्या मते, वेदांता कंपनीमधून सहा कंपन्या वेगळ्या झाल्या की अल्पावधीत गुंतवणुकदारांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. मार्च 2024 तिमाहीत वेदांता कंपनीने 1,369 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. YoY आधारे कंपनीच्या नफ्यात 27 टक्के घट झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,881 कोटी रुपये नफा कमावला होता.
मार्च तिमाहीत कंपनीचा नफा आणि महसुल घटून देखील नुवामा, CLSA आणि सिटीग्रुप सारख्या ब्रोकरेज फर्मनी वेदांता स्टॉकवर 542 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. वेदांता कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि काचेच्या व्यवसायामध्ये पुढील चार वर्षांत 20 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.