
Post Office Scheme | तुमची छोटी बचत तुम्हाला कधी चांगला नफा देईल हे ही तुम्हाला माहित नसते. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून भरपूर नफा कमावू शकता. अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत चक्रवाढ व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अर्थात पीओआरडीची मॅच्युरिटी पाच वर्षांनंतर होते. यानंतर ती एकदा आणि 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. म्हणजे तुम्ही ते 10 वर्षे चालवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्ही पीओआरडीमध्ये 10,000 रुपयांची मासिक गुंतवणूक सुरू केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला किती पैसे मिळतील तसेच या योजनेवर मिळणारे उर्वरित बेनिफिट्स. पोस्ट ऑफिसमधील ठेवींवर कोणताही धोका नाही, येथे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.
पोस्ट ऑफिस RD वर अशी होते गणना
पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 100 रुपयांपासून रिकरिंग डिपॉझिटमध्ये (आरडी) गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला वार्षिक 5.8% व्याज मिळते.
10 हजार रुपयांमधून किती पैसे मिळतील?
जर तुम्ही दरमहा 10 हजार रुपये जमा केले तर 5 वर्षानंतर तुमच्याकडे 6,96,968 रुपयांचा गॅरंटीफंड मिळेल तसेच व्याजातून 96,968 रुपये मिळतील. या रकमेत तुमची गुंतवणूक 6 लाख रुपये आहे.
10 वर्षात किती रक्कम मिळणार
पोस्ट ऑफिसआरडी स्कीमला 5 वर्षांनंतर एकदा आणखी 5 वर्षांसाठी मुदतवाढ दिल्यास तुम्हाला 16,26,476 रुपयांचा गॅरंटीड परतावा मिळेल. यामध्ये 12 लाख रुपये तुमच्या गुंतवणुकीचे असतील. मात्र, व्याजातून 4,26,476 रुपये मिळतील.
डिपॉझिटवर कर्ज घेऊ शकता
पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाऊंटवरही तुम्ही लोन घेऊ शकता. यासाठी नियम असा आहे की, 12 हप्ते जमा केल्यानंतर तुम्ही डिपॉझिटवर 50% पर्यंत कर्ज घेऊ शकता. आपण एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करू शकता. कर्जाचा व्याजदर आरडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 2% जास्त असेल. तसेच 3 वर्षांनंतर ही योजना तुम्ही मुदतपूर्व बंद करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.