13 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Radico Khaitan Share Price | दारूत पैसा ओतू नका! दारू बनवणाऱ्या रॅडिको खेतान शेअर्समध्ये ओता, करोडमध्ये परतावा, डिटेल्स जाणून घ्या

Radico Khaitan Share Price

Radico Khaitan Share Price | रॅडिको खेतान या भारतातील मद्य कंपनीचे शेअर्स काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 4 टक्के कमजोर झाले होते. मागील पाच दिवसांत रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 9 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना फक्त 58,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून तिमाहीमध्ये कंपनीच्या महसुलात आणि निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.

मात्र काही ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स त्वरित विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 33 टक्क्यांनी खाली येऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 1,353.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

58,000 रुपये लावून करोडपती झाले :

20 जून 2003 रोजी रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 7.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1353 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 20 वर्षांत या दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17119 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 20 वर्षापुर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 58 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत.

मागील वर्षी 10 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 908.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या एका वर्षात म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 63 टक्क्यांनी वाढून 1478.45 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहोचला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत रॅडिको खेतान कंपनीने महसुलात 24 टक्के वाढ नोंदवली आहे. आणि कंपनीने निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर फक्त 1 टक्के वाढ नोंदवली आहे. या तिमाही कालावधीत कंपनीच्या निव्वळ विक्रीमध्ये 26 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते उत्पादनातील नावीन्य आणि व्यापार वाढीबाबत रॅडिको खेतान कंपनीची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. मात्र खर्चामधील वाढीमुळे कंपनीच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2024-25 साठी रॅडिको खेतान कंपनीच्या EPS चे मूल्य 30x PE वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी रॅडिको खेतान स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Radico Khaitan Share Price today on 10 August 2023.

हॅशटॅग्स

#Radico Khaitan Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x