
Vedanta Share Price | मागील काही दिवसांपासून वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सध्या वेदांता स्टॉक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीबाबत दोन नवीन अपडेट आल्या आहेत. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
पहिली अपडेट म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने एनसीडीला मंजुरी दिली आहे. 20 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एनसीडीद्वारे भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत कंपनी 1000 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.49 टक्के वाढीसह 472.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एनसीडी म्हणजेच नॉन-कन्व्हर्टेबल. हे डिबेंचर भविष्यात शेअर्स किंवा इक्विटीमध्ये रूपांतर करता येत नाही. डिबेंचर हे दीर्घकालीन भांडवल उभारणी करण्याचे आर्थिक साधन आहे, ज्याद्वारे कंपन्या कर्ज स्वरूपात भांडवल उभारणी करत असतात. यावर कंपन्या गुंतवणूकदारांना निश्चित दराने व्याज देण्याचे मान्य करतात. NCD ही एक प्रकारची सुरक्षित गुंतवणुक असते. जर तुम्हाला जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही NCD मध्ये गुंतवणूक करू शकता.
वेदांता लिमिटेड कंपनीबाबत आलेली दुसरी अपडेट म्हणजे, कंपनीचे संस्थापक आणि गैर-कार्यकारी अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आर्थिक वर्ष 2024-25 अखेर डिमर्जर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याशिवाय कंपनीने 1,000 कोटी डॉलर्सचे EBITDA लक्ष्य साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. वेदांता लिमिटेड ही कंपनी पुढील काळात 6 वेगवेगळ्या सूचीबद्ध कंपन्यामध्ये विभाजित होणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.