2 May 2025 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत सकारात्मक अपडेट, शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज, फायदा घ्या

Vedanta Share Price

Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत एक लेटेस्ट अपडेट आली आहे. या कंपनीने QIP च्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या योजनेला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी वेदांता स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 443.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )

काही महिन्यापूर्वी वेदांता कंपनीने QIP च्या माध्यमातून 8,000 कोटी रुपये भांडवल उभारणीसाठी ऑफर जाहीर केली होती. याकरता वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाने 15 जुलै रोजी QIP ऑफर ओपन केली. या इश्यूसाठी कंपनीने 461.26 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली होती. आता या प्लेसमेंटला गुंतवणूकदारांकडून 23,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे. यासह वेदांता कंपनीला भारतातील दोन नवीन खनिज खाणींसाठी बिडर म्हणून निवडण्यात आले आहे.

केंद्रीय खाण मंत्रालयाने कर्नाटकातील गोल्लारहट्टी-मल्लेनाहल्ली निकेल क्रोमियम आणि बिहारमधील पीजीई ब्लॉक आणि गेंजना निकेल, क्रोमियम खाणीसाठी संमिश्र परवाने देण्याकरता ई-लिलावात भाग घेण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. यात संमिश्र परवान्याच्या थेट ई-लिलावात वेदांता कंपनीने भाग घेतला होता. आता वेदांता कंपनीला या खाणींसाठी ‘मुख्य बिडर’ म्हणून निवडण्यात आले आहे. कर्नाटकमधील गोल्लारहट्टी-मल्लेनाहल्ली निकेल क्रोमियम आणि पीजीई ब्लॉक एकूण 1238.122 हेक्टर क्षेत्रासह अन्वेषणाच्या G4 स्तरावर आहे. तर गेंजना निकेल, क्रोमियम आणि पीजीई ब्लॉक हे एकूण 788.85 हेक्टर क्षेत्रासह अन्वेषणाच्या G3 स्तरावर आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारी वेदांता स्टॉक बीएसई इंडेक्सवर 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 439.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65.21 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. 2024 या वर्षात वेदांता स्टॉक 71 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 55 टक्के वाढवले आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काही महिन्यांत 500-520 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vedanta Share Price NSE Live 22 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vedanta Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या