15 December 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक बातमी आली, गुंतवणुकदारांना फायदा होणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Heranba Industries Share Price

Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज या कीटकनाशके आणि कृषी रसायन क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवारी 413.95 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते.

गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या वापी स्थित पेंट युनिट्सचे ऑपरेशन्स बंद करण्यासंबंधीचा आदेश मागे घेताच स्टॉक मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 394.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉकवाढीचे कारण :
प्रदूषण मंडळाने मे 2023 मध्ये वापी स्थित पँट युनिट्सवरील कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, आम्ही आमच्या 22 मे 2023 च्या पत्रात स्पष्ट केले होते की, गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने वापी स्थित पेंट युनिट्सवर एक आदेश जारी केला होता. आणि वापीची पॅन्ट युनिटमधील ऑपरेशन थांबवण्यास सांगितले होते. या संदर्भात गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेला आदेश मागे घेतला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात
हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 620.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 265 रुपये होती. या कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये 259 कोटी महसूल संकलित केला होता. तर हेरंबा इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स आणि त्याच्या मुख्य उत्पादकांपैकी एक मानली जाते.

हेरंबा इंडस्ट्रीज कंपनी कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि सार्वजनिक आरोग्य उत्पादनांसह कीटकनाशकांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे बिझनेस नेटवर्क भारतासोबत जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत 258.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 14.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Heranba Industries Share Price today on 15 June 2023.

हॅशटॅग्स

Heranba Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x