
Multibagger Stock | Venus Pipes & Tubes Ltd कंपनीचे शेअर्स खूप आकर्षक किमतीवर उपलब्ध झाले आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, Venus Pipes & Tubes Ltd कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणुकदार या स्टॉक वर उत्साही आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर ‘ बाय ‘ रेटिंग दिली असून रेटिंगसह शेअरची लक्ष्य किंमत 848 रुपयेवरून अपडेट करून 940 पर्यंत वाढवली आहे. व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा IPO 2022 च्या मे महिन्यात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 125 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स 730.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पुढील काळात शेअरमध्ये वाढ होऊ शकते :
भारतीय व्यापार महासंचालनालयाने सप्टेंबर 2022 मध्ये चीनमधून स्टेनलेस स्टीलच्या सीमलेस ट्यूब आणि पाईप्सच्या आयातीवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची शिफारस केली. 20 डिसेंबर 2022 रोजी भारत सरकारने 2027 पर्यंत म्हणजेच पुढील 5 वर्षांसाठी चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अँटी डंपिंग टॅक्स लावला. चीन मधून स्वस्त उत्पादनांची आयात थांबवण्यासाठी आणि भारतात बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने चिन मधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर अँटी डंपिंग शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन निर्णयामुळे चीन मधून आयात केले जाणारे अॅल्युमिनियम, सोडियम हायड्रोसल्फाईट, सिलिकॉन सीलंट, हायड्रोफ्लोरोकार्बन घटक R-32 आणि हायड्रोफ्लोरोकार्बन मिश्रणाच्या काही फ्लॅट रोल केलेल्या उत्पादनांवर हा टॅक्स लावला जाणार आहे. परिणाम स्वरूप व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होईल, आणि शेअर पुढील काळात कमालीची कामगिरी करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्सचा कंपनीचा आयपीओ 2022 या वर्षात मे महिन्यात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 326 रुपये निश्चित करण्यात आली होती. हा शेअर आज 730.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या कालावधीत व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही काळात कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. टार्गेट किमतीनुसार पुढील काळात हा स्टॉक 29 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.