
Vikas Ecotech Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 75157 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22881 अंकांवर क्लोज झाला होता. शेअर बाजारातील तेजीच्या काळात लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, ओएनजीसी आणि आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते.
तर पॉवर ग्रिड, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक खरेदी करू शकता. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
विकास इकोटेक लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 534 कोटी रुपये आहे. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5.65 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.80 रुपये होती. मागील एका वर्षात विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या संचालक मंडळाने आपले मार्च तिमाहीचे निकाल बुधवार दिनांक 22 मे रोजी जाहीर केले आहेत.
मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने 59.69 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 68.46 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा 3.02 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 1.64 कोटी रुपये नफा कमावला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 2.37 कोटी रुपये PBT नोंदवला होता. विकास इकोटेक लिमिटेड कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 2.06 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. तर डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 1.23 कोटी रुपये PAT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 1.78 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.