 
						Vikas Ecotech Share Price | विकास इकोटेक लिमिटेड या स्पेशल आणि ऍडिटीव्ह उत्पादन करणाऱ्या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 50 कोटी रुपये आहे. या ऑर्डरमध्ये विकास इकोटेक कंपनीला स्पेशॅलिटी पॉलिमर कंपाऊंड आणि पॉलिमर ऍडिटीव्ह बनवण्याचे काम मिळाले आहे. या ऑर्डरची पूर्तता ऑगस्ट-सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची आहे.
या ऑर्डरची माहिती मिळताच विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उसळी पाहायला मिळाली होती. विकास इकोटेक ही कंपनी मुख्यतः स्पेशालिटी पॉलिमर कंपाऊंड आणि स्पेशालिटी केमिकल्स उत्पादन करण्याचे काम करते. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
3 एप्रिल 2020 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 0.62 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 500 टक्के नफा कमवून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.67 टक्क्यांच्या वाढीसह 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
विकास इकोटेक कंपनी काही नवीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 50 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात विकास इकोटेक कंपनीने गुरुग्राम शहरात दोन ठिकाणी व्यावसायिक इमारतीचे बांधकाम आणि विकास करण्यासाठी जमिन खरेदी केली आहे. या जमीन खरेदीसाठी विकास इकोटेक कंपनीने 15 कोटी रुपये गुंतवणूक केली होती.
काही दिवसांपूर्वी विकास इकोटेक कंपनीने माहिती दिली होती, की त्यांना 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत विकास इकोटेक कंपनीला राजन रहेजा ग्रुपच्या प्रिझम जॉन्सन लिमिटेड युनिटला लोखंडी कच्चा माल पुरवठा करायचा आहे.
पुढील 15 दिवसांत विकास इकोटेक कंपनी या ऑर्डरची पूर्तता करण्याचे काम सुरू करेल, आणि कंपनी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण करेल. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये , विकास इकोटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.1 टक्क्यांच्या वाढीसह 3.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 16 वर्षांत विकास इकोटेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के नफा कमावून दिला आहे.
3 एप्रिल 2020 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 0.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आतापर्यंत विकास इकोटेक लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्के नफा कमावून दिला आहे. विकास इकोटेक या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 346 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांचा नीचांक पातळी किंमत 2.35 रुपये होती. विकास इकोटेक लिमिटेड ही कंपनी नवी दिल्लीमध्ये स्पेशॅलिटी पॉलिमर आणि स्पेशालिटी अॅडिटीव्ह आणि केमिकल्स बनवण्याचा व्यवसाय करते. यासह ही कंपनी प्लास्टिक आणि रबर उद्योग क्षेत्रात देखील काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		