 
						Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, विकास लाइफकेअर कंपनीची मटेरियल सहयोगी कंपनी जेनेसिस गॅस सोल्युशनला गुजरात गॅस लिमिटेड कंपनीने 40,000 गॅस मीटरचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. जेनेसिस गॅस सोल्युशन ही कंपनी विकास लाइफ केअर कंपनीची उपकंपनी मानली जाते.
गुजरात गॅस लिमिटेड कंपनीने दिलेल्या या ऑर्डरचे एकूण मूल्य 49.5 कोटी रुपये आहे. गुजरात गॅस लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी शहरी गॅस वितरण कंपनी म्हणून ओळखली जाते. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 0.99 टक्के वाढीसह 5.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
विकास लाइफकेअर कंपनीने जेनेसिस गॅस सोल्युशन्स कंपनीचे 95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ही कंपनी स्मार्ट गॅस मीटर आणि वीज वितरण सोल्यूशन्स यासारखे स्मार्ट उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात अस्थिरता असताना विकास लाइफ केअर स्टॉक तेजीत वाढत होता. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 7.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 727 कोटी रुपये आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड ही कंपनी मुख्यता विषमुक्त विशेष रसायने बनवण्याचा व्यवसाय करते.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने उत्पादित केलेली विशेष रसायने अन्न आणि पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जातात. विकास लाइफ केअर आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने 110 कोटी रुपये गुंतवणूक करून एक संयुक्त उपक्रम स्थापन केला आहे. या दोन्ही कंपन्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत एकात्मिक स्मार्ट मीटर निर्मिती युनिटची स्थापना करणार आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी देखील विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये एजी डायनॅमिक फंड लिमिटेड आणि सायप्रस ग्लोबल आर्बिट्रेज फंड यांनी विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		