
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. विशेष रसायन उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. विकास लाइफ केअर लिमिटेड या कंपनीची उत्पादने जगातील बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे सुरक्षित म्हणून मान्यता लेपत आहे.
मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या घसरणीच्या काळात दिग्गज कंपन्याच्या शेअरमध्ये पडझड पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पेनी स्टॉक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 8.99 टक्के वाढीसह 4.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्क्यांच्या वाढीसह 4.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 690 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 7.5 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2.70 रुपये होती.
मागील सहा महिन्यात विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी प्रेफरेंशियल शेअर्स इश्यूद्वारे प्रवर्तकाना वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. विकास लाइफ केअर कंपनीच्या प्रवर्तकाना 24.25 कोटी पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
विकास लाइफकेअर कंपनीने 1 रुपये दर्शनी मूल्य असलेच्या शेअर्सचे वॉरंट 4 रुपये प्रति वॉरंट दराने जारी केले आहेत. या कंपनीच्या शेअर धारकांच्या मंजुरी येणे बाकी आहे. या वॉरंट इश्यूमुळे विकास लाइफ केअर कंपनी 97 कोटी रुपये भांडवल उभारणी करेल. 11 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 3.10 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 60 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.