14 December 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर अल्पावधीत देईल 41 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस पहा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर युद्धाचे ढग निर्माण झाले असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. भारताच्या काही शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदरांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. साहजिकच त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.

मात्र अशा काळात देखील ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के घसरणीसह 169.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

CLSA ने अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, अशोक लेलँड स्टॉक 238 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 20 डिसेंबर 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 169.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास अशोक लेलँड स्टॉक अल्पावधीत 41 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

2023 या वर्षात अशोक लेलँड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 191.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133.10 रुपये होती.

सीएलएसए फर्मच्या मते, अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत व्हॉल्यूम वाढ पाहायला मिळत आहे. मालवाहतुकीचे दर आणि ई-वे बिलांमध्ये दुहेरी अंकी वाढ आणि मालवाहतुकीच्या दरांमुळे व्यावसायिक वाहनांमध्ये होणारी चढउतार पाहून अनेक गुंतवणूक सल्लागार अशोक लेलँड स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकवर 238 रुपये टारगेट प्राइससाठी पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE 21 December 2023.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x