 
						Vikas Lifecare Share Price | विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक किंचित वाढीसह क्लोज झाला होता. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 71892 अंकांवर आणि निफ्टी-50 इंडेक्स 20 अंकांच्या वाढीसह 21758 अंकांवर क्लोज झाला होता.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 7.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 4.67 टक्के घसरणीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
विकास लाइफ केअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1080 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.70 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे.
31 जुलै 2023 रोजी विकास लाइफ केअर कंपनीचे शेअर्स 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या गुंतवणूकदारांनी पैसे लावले होते, त्यांनी तब्बल 146 टक्के नफा कमावला आहे. नुकताच कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे भांडवल उभारणी करण्यासाठी परवानगी दिली आहे.
29 जानेवारी 2024 रोजी विकास लाइफ केअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालकांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही कंपनी QIP च्या माध्यमातून 50 कोटी रुपये निधी जमा करणार आहे.
या कंपनीने पूर्वी QIP च्या माध्यमातून 50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने पात्र संस्थात्मक प्लेसमेंटद्वारे 7.08 रुपये प्रति इक्विटी शेअर किंमतीवर 50 कोटी रुपये भांडवल उभारण्यास मान्यता दिली आहे.
नुकताच या कंपनीने सेबीला नवीन जमीन संपादित केल्याची माहिती दिली आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने आपली उत्पादन क्षमता विस्तार करण्यासाठी आणि पॉलिमर, रबर कंपाऊंड्सचा व्यवसाय वाढवण्यासाठी राजस्थान मधील शाहजहानपूर येथे RIICO इंडस्ट्रियल एरियामध्ये कारखान्याजवळच 1800 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या जमीनीचे संपादन केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		