13 December 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्स पुन्हा घसरणार? शेअर्स होल्ड करावे की नाही? काय म्हटले टॉप ब्रोकरेजने?

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी या सरकारी विमा कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. याचा सकारात्मक परिणाम बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअरवर पाहायला मिळाला. नवीन आकडेवारीनुसार एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रात बाजार हिस्सा वाढला आहे. डिसेंबर 2023 मध्ये एलआयसी कंपनीचा विमा क्षेत्रातील बाजार हिस्सा 12 पॉइंट्सने वाढला आहे. त्यामुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

मागील 6 महिन्यांत एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली आहे. आणि गुंतवणूकदारांनी सहा महिन्यात एलआयसी स्टॉकमधून 35 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 0.60 टक्के घसरणीसह 833.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत एलआयसी कंपनीचा मार्केट हिस्सा वाढला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2023 दरम्यान एलआयसी कंपनीने विमा क्षेत्रातील 3.7 टक्के अधिक वाटा काबीज केला आता डिसेंबर 2023 मध्ये यात तब्बल 12 bps ची वाढ नोंदवली गेली आहे.

एलआयसी आणि SBI Life या दोन दिग्गज कंपन्याव्यतिरिक्त इतर सर्व विमा कंपन्यांचा बाजार हिस्सा आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये घटला आहे. डिसेंबर 2023 मध्ये एलआयसी कंपनीचा प्रीमियम 93.8 तक्के वाढला आहे. तथापि, LIC कंपनीचे वैयक्तिक APE देखील 2 टक्के वाढले असून जीवन विमा प्रीमियममध्ये 43.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर ‘न्यूट्रल’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांनी एलआयसी स्टॉकवर 750 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. LIC कंपनीचे शेअर्स 9 जानेवारी 2024 रोजी 832.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत एलआयसी या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34.35 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 11 January 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x