
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड स्टॉक एक टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 892 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर स्टॉक 5.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )
विकास लाइफ केअर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.80 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी विकास लाइफकेअर स्टॉक 1.01 टक्के वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स फक्त दोन टक्के वाढले आहेत.
मागील 1 वर्षात विकास लाइफ केअर स्टॉक 2.95 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी मागील आर्थिक वर्षाच्या निकालांना मान्यता दिली होती. 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीचे उत्पन्न 122.5 कोटी रुपये नोंदवले गेले होते. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 116.5 कोटी रुपये कमाई केली होती. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 95.12 कोटी रुपये कमाई केली होती.
मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा 3.5 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा PBT 34.04 कोटी रुपये होता. आणि मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा PBT 2.1 कोटी रुपये होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 1.81 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 25.96 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 2.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.