29 April 2024 9:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Alpex Solar Share Price | लॉटरी लागली! एकदिवसात 215 टक्के परतावा मिळाला, IPO पैसा वेगात वाढवत आहेत

Alpex Solar Share Price

Alpex Solar Share Price | अल्पेक्स सोलर या सोलर पॅनेल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. या कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी 200 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 362.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अमेरिकन गुंतवणूक संस्था BofA सिक्युरिटीज फर्मने खुल्या बाजारातून अल्पेक्स सोलर कंपनीचे 200,000 पेक्षा अधिक शेअर्स खरेदी केले आहेत. BofA Securities Europe SA फर्मने राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजवर अल्पेक्स सोलर कंपनीचे 220,800 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. BofA सिक्युरिटीज फर्मने अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 337.47 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले आहे. मात्र कंपनीने विक्रेत्याचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.

अल्पेक्स सोलर ही कंपनी मुख्यतः उत्तर भारतात सोलर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन सेल तंत्रज्ञानाचा वापर करून सोलर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स बनवण्यात एक्स्पर्ट मानली जाते. या कंपनीची स्थापना ऑगस्ट 1993 साली झाली होती. अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 215 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 115 रुपये होती.

गुरुवार, दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अल्पेक्स सोलर कंपनीचे शेअर्स 329 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगनंतर लगेचच हा स्टॉक 5 टक्के अपर सर्किटसह 345.45 रुपये किमतीवर पोहचला होता. तर शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 362.70 रुपये किमतीवर पोहोचले होते. म्हणजेच IPO किमतीच्या तुलनेत अल्पेक्स सोलर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO एकूण 324.03 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 351.89 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alpex Solar Share Price NSE Live 17 February 2024.

हॅशटॅग्स

Alpex Solar Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x