
Visagar Polytex Share Price | विसागर पॉलिटेक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मार्च 2023 रोजी विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.68 पैशांवर ट्रेड करत होते.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.33 टक्के वाढीसह 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
YTD आधारे विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 69 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 129 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत विसागर पॉलिटेक्स स्टॉक तब्बल 110 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 5.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर, सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे. 94.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांकडे सध्या कंपनीचे 1,64,88,533 शेअर्स आहेत.
सेबीने विसागर पॉलिटेक्स लिमिटेड कंपनीला ASM स्टेज 1 श्रेणीत ठेवले आहेत. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी असे कठोर निर्णय घेत असते. विसागर पॉलिटेक्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. विसागर पॉलिटेक्स लिमिटेड ही कंपनी आपल्या रिटेल चेन आणि होलसेल चॅनेलच्या माध्यमातून VIVIDHA या ब्रँड नावाने व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.