
Vivanza Biosciences Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय तसेच जागतिक शेअर बाजारात भावना नकारात्मक आहेत. अशा काळात शेअर बाजारात बऱ्याच शेअरची पडझड सुरू झाली आहे. मात्र निवडक शेअर्सच्या किमती कमालीच्या तेजीत वाढताना पाहायला मिळत आहेत. असाच एक स्मॉलकॅप स्टॉक तज्ज्ञांच्या नजरेत आला आहे. या सेक्टरचा सलग 6 दिवस अप्पर सर्किट लागत आहे. इतकेच नाही तर मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, ‘विवान्झा बायोसायन्सेस’. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 वाढीसह 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Vivanza Biosciences Ltd)
3 वर्षात दिला 1500 टक्के परतावा :
BSE इंडेक्सवर सूचीबद्ध असलेल्या ‘विवान्झा बायोसायन्सेस’ या स्मॉल कॅप सेक्टरमधील फार्मा स्टॉकने मागील 3 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 12.45 रुपयांवरून वाढून 207.80 रुपयांवर पोहचली आहे. 6 मार्च 2023 पासून या कंपनीचे शेअर्स दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 शेअरचे 10 तुकडे होणार :
‘विवान्झा बायोसायन्सेस’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनी प्रत्येक 1 शेअरचे 10 तुकडे करणार आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 24 मार्च 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
एका महिन्यात 40.36 टक्के परतावा :
‘विवान्झा बायोसायन्सेस’ या फार्मा सेक्टरमधील कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या शेअर धारकांना मागील एका महिन्यात 40.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 182 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 115.55 रुकाये होती. तर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 79.18 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.