3 May 2025 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी सलग चौथ्या दिवशी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून (NSE: IDEA) बंद झाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 820 अंकांनी घसरला आणि निफ्टी 23,900 च्या खाली घसरला होता. दरम्यान, व्होडाफोन-आयडिया कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने केंद्र सरकारकडे बँक गॅरंटीमध्ये सूट मागितली होती. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी आर्थिक संकटात असून बँक गॅरंटीची सूट मिळावी, असं व्होडाफोन कंपनीचं म्हणणं आहे. टेलिकॉम स्पेक्ट्रम देयकांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून बँक गॅरंटी मागितली जाते. व्होडाफोन-आयडिया कंपनीकडे २४,७०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी आहे.

केंद्र सरकारने दिली माहिती

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या बँक गॅरंटी माफीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. मात्र जो काही दिलासा दिला जाईल, तो संपूर्ण टेलिकॉम क्षेत्राला दिला जाईल. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची स्पेक्ट्रम लिलावाच्या थकबाकीवरील स्थगिती ऑक्टोबर २०२५ मध्ये संपणार आहे. मात्र बँक गॅरंटी निर्धारित तारखेच्या १३ महिने आधी सादर करावी लागते.

क्लासिक पिव्हट लेव्हल

मंगळवार 12 नोव्हेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 7.85 रुपये, 8.05 रुपये आणि 8.15 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 7.55 रुपये, 7.45 रुपये आणि 7.25 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 1.71% वाढला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये नकारात्मक संकेत दिसत आहेत. या शेअरला शॉर्ट टर्मसाठी 11 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

या शेअरने किती परतावा दिला

मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 15.73% घसरला आहे. मागील ६ महिन्यात शेअर 39.21% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 45.09% घसरला आहे. मात्र मागील ५ वर्षात या शेअरने 109.86% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 54.94% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 12 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या