15 December 2024 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Sanofi India Share Price | भरघोस परतावा देणारी ही कंपनी आता मजबूत डिव्हीडंड देणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

Sanofi India Share Price

Sanofi India Share Price | ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ या फार्मा कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 377 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते. ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 194 रुपये अंतिम लाभांश आणि 183 रुपये विशेष लाभांश वाटप करणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर 6.62 टक्के घसरणीसह 5,569.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Sanofi India Limited)

लाभांश तपशील :
सनोफी इंडिया कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 377 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली होती. कंपनीने या लाभांश वाटपासाठी 29 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख जाहीर केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत होते.  ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनी 22 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

गुंतवणुकीवर परतावा :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.008 टक्क्यांच्या वाढीसह 5,965 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील.एका महिन्यात सनोफी इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात ‘सनोफी इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षातया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sanofi India Share Price today on 29 April 2023.

हॅशटॅग्स

#Sanofi India Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x