
Vodafone Idea Share Price | सोमवार, 30 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 4.42 टक्क्यांनी वाढून 7.80 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच शेअरमध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. सोमवारी बीएसईवर सकाळी १० वाजता व्होडाफोन आयडिया शेअर ७.९९ रुपयांवर ट्रेड करत होता. वास्तविक व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
बँक गॅरंटी सादर करण्याची अट रद्द
दूरसंचार विभागाने स्पेक्ट्रम लिलावासाठी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीकडून वित्तीय बँक गॅरंटी सादर करण्याची अट रद्द केली आहे. ही बँक गॅरंटी २०१२, २०१४, २०१५, २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावासाठी आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने सांगितले की, 27 डिसेंबर 2024 रोजी दूरसंचार विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली होती.
बँक गॅरंटीची रक्कम किती होती
यापूर्वी नियमानुसार व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला प्रत्येक स्पेक्ट्रमसाठी हप्त्यांमध्ये बँक गॅरंटी म्हणून २४,८०० कोटी रुपये द्यावे लागत होते. नियमानुसार व्होडाफोन आयडिया कंपनीला ही बँक गॅरंटी ठरलेल्या तारखेच्या १३ महिने अगोदर भरायची होती. केंद्रीय दूरसंचार विभागाच्या निर्णयानंतर व्होडाफोन आयडिया कंपनीला आता बँकेला २०१२, २०१४, २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावासाठी कोणतीही बँक गॅरंटी द्यावी लागणार नाही.
टेलिकॉम क्षेत्र आणि केंद्र सरकारची मदत
मात्र, २०१५ मध्ये झालेल्या लिलावासाठी व्होडाफोन-आयडिया कंपनीला एकरकमी रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी अंतिम रक्कम निश्चित करण्यासाठी व्होडाफोन-आयडिया कंपनी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाशी बोलणी करत आहे. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, केंद्र सरकार देशातील टेलिकॉम क्षेत्राला भक्कम पाठिंबा देते आहे. तसेच टेलिकॉम ऑपरेटर्सना 4G आणि 5G नेटवर्कचा विस्तार करून बँकिंग संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याची संधी देत आहे. केंद्र सरकारचे अलीकडचे निर्णय याचे संकेत देत आहेत असं कंपनीने म्हटलं आहे.
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात बँक गॅरंटीच्या आवश्यकतेशी संबंधित प्रस्तावासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर निवेदनामार्फत स्पष्टीकरण दिले आहे. स्पेक्ट्रम लिलावातील बँक गॅरंटी काढून घेतल्याबाबत केंद्रीय दूरसंचार विभागाकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने त्यावेळी सांगितले होते.
व्होडाफोन-आयडिया शेअरची स्थिती
अलीकडच्या काळात व्होडाफोन आयडिया शेअरची कामगिरी नकारात्मक राहिली आहे. मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया शेअर 57 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या वर्षभरात व्होडाफोन आयडिया शेअर ५२ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे एकूण मार्केट कॅप ५३,४५९.७६ कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.