27 July 2024 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअर 1 दिवसात 24% वाढला

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीमध्ये इक्विटी रूपांतरण प्रस्ताव मंजूर केला आहे. सध्या केंद्र सरकार ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनी मधील सर्वात मोठी गुंतवणुकदार बनली आहे. म्हणजे Vi कंपनी टेलिकॉम क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी बनली आहे. या संदर्भात भारत सरकार आणि व्होडाफोन आयडिया यांच्यात बराच काळ चर्चा आणि विचार विमर्श सुरू होता. ज्याला भारत सरकारने शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीची थकबाकी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा मंजुर केला आहे. स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते जमा न करू शकल्याने थकलेले व्याज आणि AGR देय रक्कम पूर्णपणे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 7.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल (सोमवार, ०६ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 24% वाढला होता. तर आज सकाळी (मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 3.64% वाढीसह 8.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)

भारत सरकार VI मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार :
व्होडाफोन आयडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करावयाची एकूण रक्कम 16133 कोटी रुपये आहे. भारत सरकारने थकबाकीच्या बदल्यात VIL कंपनीला प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 16.13 अब्ज शेअर जारी करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2022 या महिन्यात शेअर बाजार नियामक सेबीने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या करोडो रुपयांच्या एजीआर थकबाकीचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी ‘रिलायन्स जिओ’ च्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे पूर्वी काम करणाऱ्या अनेक कंपन्यांची अवस्था बिकट झाली. जिओ कंपनीने देशात झपाट्याने विस्तार केला आणि दूरसंचार क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडून टाकले. अनेक टेलिकॉम कंपन्याना जिओमुळे जबरदस्त तोटा सहन करावा लागला, त्यामुळे त्या कंपन्या बाजारातून बाहेर पडल्या. दूरसंचार कंपन्यांवरील कर्ज, एजीआर थकबाकी, व्याजाची थकबाकी यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या अडचणी वाढल्या. कर्जबाजारी खाजगी दूरसंचार कंपन्यांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने 2021 मध्ये ‘दूरसंचार सुधारणा पॅकेज’ घोषित केले होते. यामुळे भारत सरकारने दूरसंचार कंपन्यांना AGR दायित्व आणि संबंधित व्याज थकबाकीच्या बदल्यात इक्विटी शेअर्स देण्याचे आदेश दिले. या अंतर्गत, भारत सरकारने विविध टेलिकॉम कंपन्यांच्या 16133 कोटी रुपयांची थकबाकी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करून घेतली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price 532822 stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x