
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मे 2019 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 14 रुपये किंमतीच्या पार गेले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 16 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 12 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 70000 कोटी रुपये आहे. मागील तीन महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 80 टक्के आणि मागील सहा महिन्यांत 100 टक्के मजबूत झाला आहे. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.39 टक्के वाढीसह 14.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
डिसेंबर 2022 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये FII चा वाटा 3.59 टक्के होता. त्यानंतर मार्च 2023 मध्ये FII ने आपले शेअर्स विकून कंपनीतील आपली हिस्सेदारी 2.28 टक्केवर आणली होती. जून 2023 मध्ये FII ने पुन्हा व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. आणि सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत आपला हिस्सा 2.46 टक्के केला. DII ने व्होडाफोन सप्टेंबर 2023 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचे 34.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. व्होडाफोन आयडिया कंपनीला कर म्हणून भरलेले 1128 कोटी रुपये परत करण्याचे आदेश कोर्टाने आयकर विभागाला दिले आहे. आयकर विभाग व्होडाफोन आयडिया कंपनीला ही रक्कम व्याजासह परत करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.