 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA च्या तज्ञांनी आपल्या अहवालात व्होडाफोन आयडिया स्टॉकमधे घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 5 रुपये किमतीवर येऊ शकतो. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर चिंता व्यक्त केली आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 12.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
सीएलएसए फर्मच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीने मागील 12 महिन्यांत आपले 17 लाख ग्राहक गमावले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या 9 महिन्यांत या कंपनीचे कॅपेक्स 1300 कोटीवर आले होते. आता या कंपनीने 20,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने आदित्य बिर्ला समूहाच्या युनिटला 2080 कोटी रुपये मूल्याचे प्रेफरन्स शेअर्स वाटप करण्याची परवानगी दिली आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनी ओरियाना इन्व्हेस्टमेंट कंपनीला 139.5 कोटी इक्विटी शेअर्स 14.87 रुपये दराने जारी करणार आहे. मात्र यानंतर देखील व्होडाफोन आयडिया कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा खूप कमी आहे. या कंपनीचे 2025-26 चे वार्षिक स्पेक्ट्रम आणि AGR देय अद्याप प्रलंबित आहेत. 2024 या वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 25 टक्के घसरला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉक 106 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची नीचांक किंमत पातळी 6 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 18.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		