 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक विकण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक 16 रुपयेच्या आसपास विकण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीची नेटवर्थ नकारात्मक आहे. या कंपनीवर खूप मोठे कर्ज थकीत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
याशिवाय कंपनीने आपले अनेक गुंतवणुकदार गमावले आहेत. हा स्टॉक दर्जेदार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जर तुम्ही दूरसंचार क्षेत्रात गुंतवणुक करू इच्छित असाल तर तुम्ही भारती एअरटेल स्टॉक खरेदी करू शकता. सोमवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 16.17 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.44 टक्के घसरणीसह 15.62 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील एका आठवडाभरात व्होडाफोन आयडिया स्टॉक 5.21 टक्क्यांनी मजबूत झाला होता. मागील 2 आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 0.62 टक्क्यांनी वाढले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 0.50 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 11.68 टक्क्यांनी घसरला होता.
ज्या लोकांनी 1 वर्षापूर्वी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी केला होता, त्यांना आता 99.6 टक्के नफा मिळाला आहे. मागील 2 वर्षात व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 85.53 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील 3 वर्षांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 148.62 टक्के नफा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत हा स्टॉक 201.49 टक्के वाढला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		