 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कर्जदात्यांच्या संघाने व्होडाफोन आयडिया कंपनीला 14,000 कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
कन्सोर्टियमने हा निधी हप्त्यांमध्ये वितरित करणे अपेक्षित आहे. या पैशांचा वापर 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि अतिरिक्त स्पेक्ट्रमसाठी बोली लावण्यासाठी, तसेच ऑपरेशनल क्रेडिट्सच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाणार आहे. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.03 टक्के घसरणीसह 16.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने आपला FPO यशस्वी करून दाखवला होता. आता ही दूरसंचार कंपनी 25,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी करत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे उद्दिष्ट 25,000 कोटी कर्ज आणि 10,000 कोटींपर्यंत अतिरिक्त नॉन-फंड आधारित भांडवल उभारण्याचे आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले एकूण बँक कर्ज 40,000 कोटी रुपयेवरून 4,000 कोटी रुपयेवर आणले आहे. मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 7,675 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीला 6,419 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीने 10,607 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीला 31238.4 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीला 29,301,1 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. या कालावधीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 1.1 टक्क्यांनी वाढून 42,651.7 कोटी रुपये नोंदवले गेले होते. 2022-23 मध्ये हे प्रमाण 42.177.2 कोटी रुपये होते.
व्होडाफोन आयडिया कंपनीची प्रति ग्राहक सरासरी कमाई वार्षिक आधारावर 7.6 टक्क्यांनी वाढून 146 रुपये नोंदवली गेली आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 16.28 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 120 टक्के मजबूत झाले आहेत. तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 18 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 22 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		