 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या 18,000 कोटी रुपये मूल्याच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंगमधील अँकर गुंतवणूकदारांचा 30 दिवसांचा लॉक-इन कालावधी सोमवार दिनांक 27 मे रोजी संपला. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7.54 टक्के वाढीसह 15.11 रुपये किमतीवर पोहचले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
मात्र सोमवारी या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग देऊन टार्गेट प्राइस 13.10 रुपयेवरून वाढवून 18 रुपये केली आहे. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.33 टक्के घसरणीसह 14.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 20-22 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, या शेअरची योग्य खरेदी किंमत 14 रुपये ते 14.50 रुपये आहे. मेहता इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे FPO नंतरचे यश लक्षणीय आहे. तसेच 4G सेवा लॉन्च करण्यासाठी आणि समवयस्कांशी स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल कंपनीला मिळाले आहे”.
ITI ग्रोथ अपॉच्युनिटीज फंडच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. यामुळे स्टॉक वरचा विक्रीचा दबाव बराच कमी झाला आहे. हा स्टॉक पुढील काळात 18-20 रुपये किंमत स्पर्श करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या कंपनीने फॉलो ऑन ऑफरमधून 18,000 कोटी रुपये निधी जमा केला आहे. ही दूरसंचार कंपनी देशातील निवडक भागात आपली 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.
व्हीआयएल कंपनीचे सीईओ अक्षय मुद्रा यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंपनीची 5 जी रोलआउट सेवा पुढील 24-30 महिन्यात कंपनीच्या एकूण कमाईच्या 40 टक्के भाग कव्हर करेल. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 18.42 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.87 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,00,456.50 कोटी रुपये आहे. हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या साध्या मुविंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		