
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचा पेनी शेअर आता तेजीचे संकेत देत आहे. त्यामुळे सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
शेअर गुंतवणूकदारांना 68% परतावा देऊ शकतो
सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरबाबत सकारात्मक संकेत देतं आहेत. सिटी ब्रोकरेज फर्मच्या मते व्होडाफोन आयडिया शेअर गुंतवणूकदारांना 68% परतावा देऊ शकतो. मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 1.67 टक्क्यांनी घसरून 7.64 रुपयांवर पोहोचला होता. व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर मागील वर्षभरात ५५ टक्क्यांनी घसरला आहे.
ब्रोकरेजने तेजीचे संकेत का दिले?
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने यापूर्वीच्या निविदांमध्ये मिळालेल्या स्पेक्ट्रमची बँक गॅरंटी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्होडाफोन आयडियासा लिमिटेड कंपनीसाठी हा मोठा आर्थिक दिलासा आहे.
24,800 रुपयांची बँक गॅरंटी
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची 2012, 2014, 2015, 2016 आणि 2021 या वर्षांमध्ये खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमची बँक गॅरंटी केंद्र सरकारकडून माफ करण्यात आली आहे. मात्र, त्यात काही अटी आणि शर्ती लागू आहेत. या घोषणेपूर्वी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला सुमारे 24,800 रुपयांची बँक गॅरंटी सादर करावी लागत होती.
व्होडाफोन आयडिया शेअर टार्गेट प्राईस
सीएनबीसी टीव्ही 18 वृत्तवाहिनीच्या अपडेटनुसार, सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. सिटी ब्रोकरेज फर्मच्या मते व्होडाफोन आयडिया शेअर १३ रुपये टार्गेट प्राईस पर्यंत वाढू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.