
Vodafone Idea Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील घसरण थांबलेली नाही. दरम्यान, तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवारी व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्समध्ये सपाट ट्रेडिंग झाली होती. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने या शेअरची टार्गेट प्राईस देखील जाहीर केला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – व्होडाफोन आयडिया शेअर टार्गेट प्राईस
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरची टार्गेट प्राईस ५० टक्क्यांनी कमी केली आहे.
जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, ‘नुकत्याच झालेल्या टॅरिफ दरवाढीचा परिणाम एआरपीयू आणि महसुलावर पुढील दोन तिमाहीत प्रतिबिंबित होईल, अशी व्होडाफोन आयडिया कंपनीला अपेक्षा आहे. जिओजित फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी 8.6 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे, जी आधी 17 रुपये होती.
व्होडाफोन आयडिया कंपनी निधी उभारणार
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने प्रेफरन्शियल शेअर्स जारी करून 1,980 कोटी रुपये उभारण्याची अधिकृत घोषणा केली होती. कंपनी व्होडाफोन ग्रुपमधील ओमेगा टेलिकॉम होल्डिंग्स आणि उषा मार्टिन टेलिमॅटिक्स यांना अनुक्रमे 1,280 कोटी आणि 700 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करणार आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीकडून एफपीओ माध्यमातून १८,००० कोटी रुपये उभे केल्यानंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
व्होडाफोन आयडिया शेअर 44.61 टक्के घसरला
मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअर 2.38% घसरला आहे. मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 7.72% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 53.65%% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 44.61% घसरला आहे. YTD आधारावर शेअर 54.06% घसरला आहे. तसेच मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 19.24%% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 84.91% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.