
VR Films Share Price| व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनी आपल्या शेअर धारकांना 7 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या शेअरधारकांना प्रत्येक शेअरवर सात बोनस शेअर्स मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के वाढीसह 400.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात शेअरने 45.96 टक्के परतावा दिला
व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीचे मागील एका महिन्यात जबरदस्त वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 390.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 18.62 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45.96 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 2 वर्षांत 250 टक्के परतावा दिला
15 जुलै 2023 रोजी व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 7 : 1 या प्रमाणात मोडग बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 26 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. मागील 2 वर्षांत व्हीआर फिल्म्स अँड स्टुडिओ लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना 250 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 519.58 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.