 
						VST Tillers Share Price | व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत धावत होते. शुक्रवारी हा स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 3790 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीच्या शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, एक सकारात्मक बातमी होती.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स 6.96 टक्क्यांच्या वाढीसह 3530 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह 3,505.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉक वाढीचे कारण
व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कंपनीने एका अमेरिकन कंपनीसोबत व्यापारी करार केला आहे. व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स आणि अमेरिकन कंपनी Solectrac Inc या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रिक पॉवर टिलर आणि कृषी यंत्रे बनवणार आहे. ही बातमी जाहीर होताच शेअर बाजारातील गुंतवणुकदारांनी व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
शेअरची कामगिरी
मागील एका वर्षभरात व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 43.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 57.60 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,790.00 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2,027.95 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		