
Welspun India Share Price | ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी अचानक तेजीत पाहायला मिळाली, मात्र आज हा स्टॉक किंचित प्रॉफिट बुकींगला बळी पडला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 103.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
स्टॉक वाढीचे कारण म्हणजे या कंपनीच्या संचालक मंडळाने 195 कोटी रुपये मूल्याची बायबॅक योजना जाहीर केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. बुधवार दिनांक 3 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 100.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीची बाय बॅक योजना :
वेलस्पन इंडिया कंपनी 1.62 कोटी रुपये पर्यंतचे शेअर्स 120 प्रति शेअर या किमतीवर बाय बॅक करणार आहे. कंपनीने 29 एप्रिल 2023 रोजी शेअर बायबॅक करण्याची योजना जाहीर केली होती. वेलस्पन इंडिया कंपनीने 10 मे हा दिवस रेकॉर्ड तारख म्हणून निश्चित केला आहे. ही कंपनी निविदा ऑफरद्वारे शेअर्स बाय बॅक करण्याचा प्रयत्न करेल. मार्च 2023 च्या तिमाहीत वेलस्पन इंडिया कंपनीने 1365.78 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
या कालावधीत कंपनीने 77.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 10 पैसे लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 30 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने लोकांना 380 टक्के नफा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी वेलस्पन इंडिया कंपनीचे शेअर्स 21.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 103.10 रुपयेवर पोहोचले होते.
त्याच वेळी वेलस्पन इंडिया कंपनीचे शेअर्स या वर्षी 32 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 104.90 रुपये होती. तर वेलस्पन इंडिया कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 62.20 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.